ऐश्वर्या-आराध्याला कोरोनाची लागण झाली आहे का? आरोग्यमंत्र्यांनी ट्विट डिलीट केल्याने संभ्रम


मुंबई – सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ आता ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या हिला देखील कोरोनाची लागण झाल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीदेखील ट्विट करुन दिली होती. पण ते ट्विट काही वेळातच डिलीट केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोरोना चाचणी खरंच पॉझिटिव्ह आली की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ऐश्वर्या राय-बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन या दोघींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच जया बच्चन यांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. सुदैवाने जया बच्चन आणि श्वेता नंदा यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांचे काही वेळापूर्वी अँटीजन रिपोर्ट निगेटिव्ह आले होते, पण ऐश्वर्या आणि आराध्याचे अंतिम रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सध्या समजत आहे. बच्चन कुटुंबातील सदस्य लवकरच बरे होवोत, ही सदिच्छा”, असं ट्विट राजेश टोपे यांनी केले होते. पण ते ट्विट त्यांनी काही क्षणातच डिलीट केल्याचे पाहायला मिळाल्यामुळे ऐश्वर्या आणि आराध्या यांच्या रिपोर्ट्सचे नेमके सत्य काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment