रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा; कोरोना प्रतिबंधक लस सर्व प्रकारच्या चाचणीत पास


मॉस्‍को – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा बिमोड करण्यासाठी सर्वच देशातील संशोधक अहोरात्र मेहनत करत आहेत. पण यात आता रशियाने बाजी मारली आहे. कारण कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याचा दावा रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने केला आहे. यासंदर्भात माहिती देताना विद्यापीठाने म्हटले आहे, की या लसीची सर्वप्रकारची चाचणी व परीक्षण यशस्वीपणे पार पडले असून कोरोनावरील जगातील ही पहिली प्रतिबंधक लस ठरेल, असा विद्यापीठाचा हा दावा आहे.

दरम्यान आपल्या देशासह, अमेरिका आणि जगातील इतर विकसित देश कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी अहोरात्रम मेहनत करत आहेत. अनेक जण चाचणी दरम्यान अयशस्वीही झाले आहेत. पण, रशियाने पहिली प्रतिबंधक लस यशस्वी झाल्याचा दावा करत बाजी मारली आहे.

यासंदर्भात इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदिम तरासोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या प्रतिबंधक लसीच्या परीक्षणाला विद्यापीठाने 18 जूनलाच सुरूवात केली होती. त्याचबरोबर कोरोनोविरोधातील जगातील पहिल्या प्रतिबंधक लसीचे स्वयं सेवकांवरील परीक्षण सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

मानवी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोरोना प्रतिबंधक लस यशस्वीपणे तयार करणे या संपूर्ण संशोधनाचा हेतू होता. की सुरक्षिततेच्या दृष्टाने या प्रतिबंधक लसीची सर्व बाबींची तपासणी केली आहे. तसेच लोकांच्या सुरक्षिततेसाठी ही व्हॅक्सीन लवकरच बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटोलॉजी आणि ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिसिजचे संचालक अलेक्झँडर लुकाशेव यांनी दिली आहे.

वदिम तरासोव म्हणाले, सेचेनोव्ह विद्यापीठाने केवळ एक शैक्षणिक संस्था म्हणूनच नाही, तर एक वैज्ञानिक आणि टेक्निकल रिसर्च केंद्र म्हणूनही कौतुकास्पद काम केले आहे. महामारीच्या परिस्थितीत ड्रग्ज सारख्या महत्वपूर्ण आणि जटिल उत्पादनांच्या निर्मितीसाठीही हे विद्यापीठ सक्षम आहे. तसेच परीक्षणातील स्वयंसेवकांच्या दुसऱ्या गटाला 20 जुलैला सुट्टी देण्यात येईल, असे म्हटले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment