अमिताभ यांच्या ‘जलसा’ बाहेर पालिकेचे ‘कन्टेन्मेंट झोन’चे बॅनर


कोरोनाची महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना लागण झाल्यानंतर अमिताभ यांचे निवासस्थान असलेल्या जलसा या बंगल्याचे सॅनिटाइजेशन करण्यात आले असून अमिताभ आणि अभिषेक यांनी शनिवारी रात्री स्वत: त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आज सकाळी जलसावर धडकले आणि जलसा व संपूर्ण परिसर सॅनिटाइज केला गेला. सॅनिटाइज करण्यासाठी आलेल्या सर्व कर्मचा-यांनी पीपीई किट घातले होते.


तत्पूर्वी नानावटी रूग्णालयात अमिताभ यांना दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून रुग्णालयातील आयसोलेशन युनिटमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. अमिताभ स्वत: ट्विवटवरुन आपल्या आरोग्यासंदर्भात माहिती देत राहतील, असेही रुग्णालयाने स्पष्ट केलेआहे. अमिताभ यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यालाही कोरोनाची लागण झाली आहे. ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही कोरोना चाचणी झाली. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Leave a Comment