अॅपलने आपल्या पुरवठादार कंपन्यांना प्रकल्प चीनच्या बाहेर उत्पादन हलविण्यास सांगितले


नवी दिल्ली : भारत-चीन-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवानची कंपनी फॉक्सकॉन कंपनी भारतातील प्रकल्प आणखी मोठा करण्याच्या तयारीला लागली असून चेन्नईच्या पेरुबुदूरमध्ये हा प्रकल्प आहे. कंपनी यासाठी एक अब्ज डॉलर म्हणजेच 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. विशेष म्हणजे अ‍ॅपलचे मोबाईल ही कंपनी असेंबल करते.

फॉक्सकॉन घेतलेला हा निर्णय अ‍ॅपलचाच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण चीनमधील उत्पादन दुसऱ्या देशात हलविण्याच्या तयारीला अ‍ॅपल लागल्याचे सांगितले जात आहे. एका सूत्राने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला आधीच बिजिंग आणि वॉशिंग्टनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मोठे ट्रेड वॉर सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धाला आता आणखी वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अॅपलने आपल्या पुरवठादार कंपन्यांना उत्पादन प्रकल्प चीनच्या बाहेर हलविण्यास सांगितले आहे. याचा परिणामही दिसू लागला असल्याचे सांगितले आहे.

श्रीपेरुंबदूर प्रकल्पामध्ये फॉक्सकॉनने मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येथे सध्या आयफोनचे एक्सआर मॉडेल बनविले जाते. पुढील तीन वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. अ‍ॅपलचे जे अन्य मॉडेल चीनमध्ये फॉक्सकॉनद्वारा बनविले जातात ते आता भारतातच बनणार आहेत. फॉक्सकॉनचे मुख्यालय तैवानच्या तैपेईमध्ये आहे. फॉक्सकॉनच्या या पावलामुळे भारतात जवळपास 7000 रोजगार उपलब्ध होणार आहेत. कंपनीचा आंध्रप्रदेशमध्येही प्रकल्प आहे. ज्यामध्ये कंपनी शाओमीसाठी स्मार्टफोन बनविते.

गेल्या महिन्यातच भारतात गुंतवणूक वाढविणार असल्याचे फॉक्सकॉनचे अध्यक्ष लिऊ योंग वे यांनी जाहीर केले होते. पण, याबाबत अधिक माहिती दिली नव्हती. अ‍ॅपलकडे भारतात स्मार्टफोनच्या एकूण विक्रीचा 1 टक्के हिस्सा आहे. अ‍ॅपल ही जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन बनविणारी कंपनी आहे. बंगळुरूमध्ये तैवानची आणखी एक कंपनी विस्ट्रॉन कॉर्पमधूनही अ‍ॅपल काही मॉडेल असेम्बल करते. आणखी एक प्रकल्प ही कंपनी उभारणार असून यामध्ये आणखी अ‍ॅपलचे फोन बनविले जाणार आहे.

Leave a Comment