अमिताभ, अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह


बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पण त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अमिताभ आणि अभिषेक यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या हिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.


यासंदर्भातील माहिती देण्यासाठी अभिषेक बच्चनने एक ट्विट केले असून, तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, माझी आणि माझ्या वडीलांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून आम्हा दोघांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व स्टाफ आणि कुटुंबातील सदस्यांना मी कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. मी सर्वांना विनंती करतो की शांत राहा आणि घाबरू नका. धन्यवाद”…


तर अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात माहिती देताना, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. माझ्या कुटुंबियांच्या देखील कोरोना चाचणी करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी, अशी विनंतीही बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. दरम्यान रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या आणखी चाचण्या करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. अमिताभ आणि अभिषेक दोन्ही बापलेकांना मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Leave a Comment