‘गरज पडल्यास मी देखील बंदूक उचलणार’, विकास दुबेची पत्नी भडकली

8 पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे काल एन्काउंटमध्ये मारला गेला. हे एन्काउंटर खरे होते की बनावट यावरून सोशल मीडियावर वाद सुरू आहे. विकास दुबेवर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या त्याच्या पत्नीने मीडियावर राजकारणाचा आरोप केला आहे.

पत्रकारांनी विकास दुबेच्या पत्नीला विचारले की,  विकासने एवढ्या जणांची हत्या केली नव्हती का ? यावर भडकलेल्या विकासची पत्नी ऋचा म्हणाल्या की, करणारच, तू कोण आहे बोलणारा. ज्याने चूक केली त्याला शिक्षा मिळणारच, हे मी सांगत आहे. गरज पडल्यास मी देखील बंदूक उचलणार.

कानपूरच्या भैरव घाट येथे विकास दुबेवर अंत्यसंस्कार करण्यात आली. यावेळी माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर ऋचा भडकल्या. मीडियावर भडकत ऋचा म्हणाल्या की, आधी मारण्यास प्रवृत्त करता आणि त्यानंतर तोंड उचलून प्रश्न विचारायला येता. याशिवाय ऋचा यांनी म्हटले की, पतीने चूक केली होती. त्यामुळे पोलिसांनी जे केले ते योग्य केले.

दरम्यान, विकास दुबेच्या एन्काउंटर आधी त्याच्या पत्नी आणि मुलाची देखील पोलिसांनी चौकशी केली होती. मात्र नंतर त्यांना सोडण्यात आले होते.

Leave a Comment