धारावीत कोरोनावर नियंत्रण, डब्ल्यूएचओने केले कौतुक

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस एडहानोम यांनी कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवणाऱ्या अनेक देशांचे कौतुक केले आहे. या देशांमध्ये इटली, स्पेन आणि दक्षिण कोरियाचा देखील समावेश आहे. मात्र खासकरून एक नाव मुंबईमधील धारावीचे देखील आहे. ट्रेडॉस यांना धारावीत कोरोनाची साखळी तोडण्यात यश आल्याचे म्हणत धारावी मॉडेलचे कौतुक केले आहे.

टेड्रॉस एडहानोम म्हणाले की, काही देशांचे उदाहरण देता येईल. यात इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आहे. यात मेगासिटी मुंबईचे गजबजलेला भाग धारावी आहे. या लोकांमध्ये मोठ्या स्तरावर जागृकता अभियान अभियान चालण्यात आले. कोरोना व्हायरसच्या मुलभूत गोष्टी जसे की टेस्टिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन संबंधित गोष्टींची काळजी घेण्यात आली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याला नष्ट करण्यासाठी प्रत्येक आजारी व्यक्तीवर उपचार करण्यात आले.

ट्रेडॉस म्हणाले की, महामारीवर मात करण्यासाठी संपुर्ण जगाने मिळून आक्रमक रुप धारण केले पाहिजे. जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्याद्वारे समजते की संसर्गाचा दर कितीही जास्त असला तरी त्यावर नियंत्रण मिळवता येते.

दरम्यान, धारावी हे मुंबईतील हॉटस्पॉट बनले होते. येथे दररोज नवीन कोरोनाग्रस्त सापडत होते. मात्र ठोस उपाय योजनांमुळे येथील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी झाला आहे.

Leave a Comment