ट्रम्प अमेरिकेत आणणार मेरिटवर आधारित इमिग्रेशन प्रणाली!

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प मेरिटवर आधारित नवीन इमिग्रेशन प्रणालीवर काम करत असल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखती ट्रम्प यांनी मेरिटवर आधारित इमिग्रेशन प्रणाली तयार करणार असल्याचे सांगितले होते. ट्रम्प म्हणाले होते की, ‘डेफर्ड एक्शन फॉर चाइल्डहुड अ‍ॅराइवल्स’ (डीएसीए) कार्यक्रमात प्राप्तकर्त्यांना नागरिकत्व देण्याच्या रुपरेषेचा समावेश असेल. डीएसीएवरील त्यांची कारवाई इम्रिगेशनवर एका मोठ्या विधेयकाचा भाग आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हे एक मोठे विधेयक आहे व चांगले विधेयक आहे. खास गोष्ट म्हणजे हे मेरिटवर आधारित असेल व यात डीएसीएचा देखील समावेश असेल. लोकांना याबाबत समजल्यावर त्यांना आनंद मिळेल. डीएसीए क प्रकारची प्रशासकिय सूट आहे. यामध्ये लहानपणी अमेरिकेत आलेल्यांना प्रत्यार्पणाचे संरक्षण दिले जाते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधेयकाबाबत चाहूल लागताच अमेरिकेत राजकारण सुरू झाले आहे. सीनेटर टेड क्रूज यांनी ही एक मोठी चूक असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment