आश्चर्यच! समुद्रात सापडला मानवाप्रमाणे ओठ आणि दात असणारा मासा, फोटो व्हायरल

जगभरात अनेक विचित्र गोष्टी आहेत. काही गोष्टी मानवी डोळ्यांना दिसतात, तर काही दिसत नाही. समुद्राबद्दल सांगायचे तर समुद्राच्या आत खोल अनेक गुपिते लपलेली आहेत, जी अद्याप समोर येणे बाकी आहे. समुद्रात अनेक विचित्र जीव आहेत, अशा जीवांना पाहिल्यावर अनेकदा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

सध्या सोशल मीडियावर एका विचित्र माशाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो मलेशियाचा असून, हा मासा खूप लोकप्रिय होत आहे. हा मासा सर्वसाधारपण माशापेक्षा खूपच वेगळा आहे. या विचित्र माशाचे होठ आणि दात अगदी मनुष्यासारखे आहेत. हा मासा पाहून वैज्ञानिक देखील हैराण झाले आहेत. कारण एखाद्या माशाचे ओठ आणि दात मनुष्यासारखे कसे असू शकतात.

हा माशाला ट्राइगरफिश नावाने ओळखले जाते. हा मासा सर्वसाधारपणे दक्षिण पुर्व आशियाच्या जलस्त्रोतांमध्ये आढळतो. याचा जबडा खूपच मजबूत असतो.

ट्विटर युजर @raff_nasir ने या माशाचा फोटो 2 जुलैला शेअर केला होता. त्यानंतर आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक युजर फोटोशॉप करून स्वतःची कलाकारी देखील जोडत आहेत.

Leave a Comment