सुशांतच्या आठवणीत बिहारमधील रस्त्याला देण्यात आले त्याचे नाव

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा देखील लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान सुशांतचे होमटाऊन असलेल्या बिहारच्या पुर्णिया येथील एका रस्त्याला सुशांतचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहराच्या महापौर सरिता देवी म्हणाल्या की, सुशांत एक महान कलाकार होता व त्याच्या नावावरून रस्त्याचे नामकरण करणे त्याला श्रद्धांजली देण्यासारखे आहे. मधुबनी ते माता चौकला जाणाऱ्या रस्त्याला सुशांत सिंह राजपूत रोड नावाने ओळखले जाणार आहे.

याशिवाय सरिता देवी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली जाणार आहे. सुशांतच्या कुटुंबाने देखील सुशांत सिंह राजपूत फाउंडेशनची स्थापना केली आहे.

Leave a Comment