पुण्यातील लॉकडाऊन आम्हाला विश्वासात न घेता, गिरीश बापट यांनी व्यक्त केली नाराजी

पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रशासनाकडून 13 ते 24 जुलै या दरम्यान पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आजुबाजूच्या भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल या निर्णयाबाबत माहिती दिली. मात्र आता पुण्याचे भापजचे खासदार गिरीश बापट यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय विश्वासात घेऊन घेतला नसल्याचे गिरीश बापट यांनी म्हटले आहे.

खासदार गिरीश बापट म्हणाले की, लॉकडाऊनचा निर्णय अजित पवार यांनी एकाही आमदार, खासदाराला विश्वासात न घेता एकतर्फी घेतला आहे. लॉकडाऊनला सहकार्य करू, मात्र या निर्णयाचा पुनर्विचार करावा.

एकीकडे अनलॉकचे निर्देश द्यायचे आणि दुसरीकडे पुण्यासारख्या शहरात लॉकडाउन लागू करायचा हे कसले धोरण?, असा सवाल ही त्यांनी केला.

बापट म्हणाले की, मास्क लावा नाही, सोशल डिस्टेंसिंग पाळले नाहीतर कडक कारवाई करा. तीन टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? लॉकडाऊनला आमचे सहकार्य आहे. मात्र एकतर्फी  निर्णय घेऊ नका. दरम्यान, पुणे व्यापारी महासंघाने देखील लॉकडाऊनला विरोध केला आहे.

Leave a Comment