… म्हणून हा वकील थेट उच्च न्यायालयाच्या बाहेर बसून विकत आहे भाजी

कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांना बिकट आर्थिक स्थितीचा सामना करावा लागत आहे. नोकऱ्या गेल्यामुळे अनेकांना आपला पेशासोडून इतर कामे करावे लागत आहे. अशाच एका ओडिशाच्या वकिलाने थेट उच्च न्यायालयाच्या बाहेरच भाजी विकण्याचा निर्णय घेतला आहे. गरजू वकिलांना मागील काही महिन्यांपासून काहीच आर्थिक मदत मिळाली नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांचा आरोप आहे की बार काउंसिलने घोषणा केल्यानंतर देखील वकिलांना कोणताही मदत निधी देण्यात आलेला नाही.

या वकिलाचे नाव सपन लाल आहे. त्यांनी सांगितले की, सरकारने लॉकडाऊनमध्ये सर्वांना आर्थिक मदत देण्याचे वचन दिले होते. मात्र काहीही मदत मिळाली नाही. वकिलांचे कुटुंब कसे वाचतील ? उत्पन्न न नसताना ते जेवण कसे करतील ? असे प्रश्नही त्यांनी विचारले.

सपन लाल म्हणाले की, मी आणि माझे कुटुंब कसे वाचेल ? मी आपल्या पत्नी आणि मुलांना विष देऊ का ? मला जिंवत राहायचे आहे, त्यामुळे मी भाजी विकण्यास सुरू केली. असोसिएशनच्या घोषणेला अनेक दिवस झाले तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोध करण्याची ही पद्धत शोधली.

5 एप्रिलला बार काउसिंल ऑफ इंडियाने ओडिशा स्टेट बार काउसिंल इमर्जेंसी फायनेंशियल असिस्टेंस रुल्स, 2020 ला मंजूरी दिली होती. या अंतर्गत लॉकडाऊनमध्ये गरजू वकिलांना 10 हजार रुपये दिले जाणार होते.

Leave a Comment