विकास दुबेच्या दोन साथीदारांना महाराष्ट्र एटीएसकडून अटक

कानपूर शूटआउट प्रकरणात वॉटेंड गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारीला महाराष्ट्र एटीएसच्या जुहू यूनिटने आज ठाण्यातून अटक केले. गँगस्टर विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर त्याचे दोन साथीदार वॉटेंड होते. मुंबई एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक यांना माहिती मिळाली होती की कानपूर शूटआउट केसमधील आरोपी गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा ड्रायव्हर सोनून ठाण्यात लपून बसले आहेत.

यानंतर दया नायक यांनी आपल्या टीमसोबत पोहचत या दोघांना अटक केले. अटक करण्यात आलेला गुड्डन त्रिवेदी हा विकास दुबेच्या अनेक गुन्ह्यामध्ये सहभागी होता.  2001 साली राज्यमंत्री संतोष शुक्ला हत्याकांडात देखील तो आरोपी होता.

कानपूरमध्ये 8 पोलिसांची हत्या केल्यानंतर गुड्डन त्रिवेदी फरार होता. दरम्यान, गँगस्टर विकास दुबेला उज्जैन येथे पोलिसांनी अटक केले होते. यानंतर कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांसोबतच्या चकमकीत तो मारला गेला होता.

Leave a Comment