येथे चक्क विकला जात आहे हिरे जडलेला मास्क, किंमत वाचून थक्क व्हाल

गुजरातच्या सुरत येथील एका ज्वेलरी शॉपने कोरोना व्हायरस महामारीच्या काळात लग्नासाठी खास मास्क तयार केला आहे. येथील मास्कची किंमत 1.5 लाख ते 4 लाख रुपयांपर्यंत आहे. येथील मास्कची खास गोष्ट म्हणजे हे मास्क हिरे जडलेले आहेत. हे हिरे खरे देखील असू शकतात व तुम्ही अमेरिकन डायमंड देखील लावून घेऊ शकता. तुम्हाला कसले हिरे लावायचे आहेत, ते तुमच्यावर आहे.

ज्वेलरी शॉपचे मालक दीपक चौकसी म्हणाले की, एक ग्राहक दुकानात आले होते. त्यांच्या घरात लग्न होते. तेव्हा माझ्या डोक्यात हिऱ्याच्या मास्कची कल्पना आली. त्यांनी वर-वधूसाठी वेगळ्या प्रकारच्या मास्कची मागणी केली. यानंतर आम्ही लग्न अविस्मरणीय करण्यासाठी डिझाइनर्सला स्पेशल मास्क बनविण्यास सांगितले.

ग्राहकांनी हे मास्क खरेदी सुरू केल्यानंतर चौकसी यांनी असे आणखी मास्क तयार केले. या मास्कसाठी सोन्यासोबतच शुद्ध डायमंड आणि अमेरिकन डायमंडचा वापर केला जातो. चौकसी यांनी सांगितले की, मास्कवरी हिरे आणि सोने ग्राहकांच्या इच्छेनुसार काढता येतात व त्याचा उपयोग दुसरे दागिने बनविण्यासाठी करता येतो.

Leave a Comment