सर्वात प्रथम या महिलेने टोचली होती कोरोना प्रतिबंधक लस, 16 आठवड्यानंतर अशी आहे स्थिती

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर सध्या लस शोधण्याचे काम आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसची लस सर्वात प्रथम टोचून घेणाऱ्या महिलेने आता आपले अनुभव शेअर केले आहेत. लसीवरील अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात मार्चमध्ये 43 वर्षीय जेनिफर हॉलर या महिलेने लस टोचून घेतली होती. 16 आठवड्यानंतर देखील जेनिफरच्या शरीरावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसून आलेले नाहीत. अमेरिकेच्या सिएटल येथे राहाणाऱ्या जेनिफर यांनी त्यांनी खूप चांगले वाटत असल्याचे म्हटले आहे.

जेनिफर हॉलर यांना कोरोनाची mRNA-1273 नावाची लस देण्यात आली होती. अमेरिकेच्या केपी वॉशिंग्टन रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये या लसीवर अभ्यास सुरू आहे. एका टेक कंपनीत ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या जेनिफर यांच्या शरीरावर लसीचा अद्याप कोणताही वाईट परिणाम झालेला नाही. ही लस अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्था आणि मॉडर्ना कंपनीने तयार केली आहे.

18 मे रोजी मॉडर्नाने माहिती दिली होती की पहिल्या टप्प्यातील ट्रायल यशस्वीरित्या पार पडले आहे. जुलैमध्ये तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू होणार असल्याची माहिती मॉडर्नाने दिली होती.

Leave a Comment