कोरोना व्हायरस पुर्णपणे नष्ट होणे अशक्य – डब्ल्यूएचओ

कोरोना व्हायरस सध्या तरी संपुर्णपणे नष्ट होणे अशक्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. डब्ल्यूएचओच्या इमर्जेंसी प्रोग्रामचे प्रमुख डॉ. माइक रयान यांनी हे वक्तव्य केले आहे. रयान म्हणाले की, कोरोना व्हायरस आता वेगाने पसरत आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार जिनिव्हामध्ये ऑनलाईन ब्रीफिंग दरम्यान डॉ. माइक रयान म्हणाले की, सध्याच्या स्थितीमध्ये असे वाटत नाही की व्हायरस पुर्णपणे नष्ट होईल. संसर्गाच्या क्लस्टरला थांबवून जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आणि पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या स्थितीला रोखू शकते.

रयान यांच्यानुसार, काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागू शकते. कारण संसर्गाच्या क्लस्टरमध्ये जंगलात आगे लागते, त्याप्रमाणे संसर्ग पसरतो. अनेक देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, दुसऱ्या देशातून येणाऱ्यांमुळे तेथेही संसर्ग वाढू शकतो.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, दशकातून एकदा येणारी महामारी वेगाने वाढत आहे आणि जगातील मोठ्या भागात यावर नियंत्रण मिळवलेले नाही.

Leave a Comment