अमेरिकेच्या धावपटूने मोडला उसेन बोल्टचा विक्रम, मात्र …

धावपटू उसेन बोल्टने 2009 साली 200 मीटर अंतर अवघ्या 19.19 सेंकदामध्ये पुर्ण करत विश्वविक्रम केला होता. त्याचा हा विक्रम अमेरिकेचा धावपटू नोहा लाइल्सने मोडला. मात्र आयोजकांच्या एका चुकीमुळे त्याचे नाव इतिहासात नोंदवले गेले नाही.

धावपटू नोहा लाइल्सने इंस्पिरेशन गेम्समध्ये भाग घेतला होता. वेगवेगळ्या शहरातून या स्पर्धेत धावपटूंनी भाग घेतला होता. याचे टिव्हीवर लाईव्ह प्रसारण देखील झाले. नोहाने अवघ्या 18.91 सेंकदामध्ये 200 मीटर अंतर धावत पुर्ण केले. आधी सर्वांना वाटले की नोहाने उसेन बोल्टचा विक्रम मोडला. मात्र पुन्हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समोर आले की, तो आपल्या लेनमध्ये 15 मीटर पुढे उभा होता.

आयोजकांच्या चुकीमुळे त्याच्या नावावर विक्रमाची नोंद झाली नाही. तो चुकीच्या लेनमध्ये उभा होता व यामुळे त्याच्या ब्लॉकचे अंतर 200 च्या ऐवजी 185 मीटर झाले. अशाप्रकारे त्याने 185 मीटर अंतर 18.91 सेंकदात पुर्ण केले.

नोहाचे विश्व चॅम्पियन बनण्याचे स्वप्न आयोजकांच्या चुकीमुळे हुकले. याबाबतचे दुःख त्यांनी ट्विटरवर देखील व्यक्त केले. सोशल मीडियावर काहीजण त्याला तर काहीजण आयोजकांना दोष देत आहेत.

Leave a Comment