एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाविषयी अजिंक्य रहाणे म्हणतो …

भारतीय क्रिकेटपटू अजिंक रहाणेने आपला शेवटचा एकदिवसीय सामना फेब्रुवारी 2018 मध्ये खेळला होता. मात्र आता आपल्याला विश्वास आहे की आपण एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू, असे रहाणेने म्हटले आहे.

क्रिकइंफोशी बोलताना रहाणे म्हणाला की, मी वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. मग ती ओपनिंगला असो की 4 नंबरला. माझी आंतरआत्मा सांगते की मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. मला संधी कधी मिळेल माहिती नाही. हे सर्व स्वतः सकारात्मक राहणे आणि आपल्या क्षमतेबाबत जाणून घेणे या संदर्भात आहे.

वनडेमध्ये कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल ?, असे विचारले असता रहाणे म्हणाला की, मी इनिंग सुरू करण्याचा आनंद घेतला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास देखील मला काही अडचण नाही. मी दोन्ही स्थानावर फलंदाजीसाठी तयार आहे. कोणते स्थान मला आवडते हे सांगणे अवघड आहे. मात्र दोन्ही ठिकाणी चांगले करू शकतो.

Leave a Comment