कपड्यांच्या आरपार पाहू शकत होता चीनी फोनचा कॅमेरा, घातली बंदी

चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लसने आपल्या लेटेस्ट फ्लॅगशिप फोनमध्ये खास कॅमेरा सेंसर दिले होते. या कॅमेऱ्याच्या मदतीने काही प्लास्टिक वस्तू आणि कपड्यांच्या आरपार पाहता येत असे. कंपनीने एक्स-रे व्हिजन कॅमेरा का दिला याची माहिती नाही, मात्र आता यावर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

वनप्लसने आपल्या वनप्लस 8 प्रो या स्मार्टफोनमध्ये इन्फ्रारेड फोटोक्रोम लेंस दिली होती. या लेंसमधून काही खास प्रकारच्या प्लास्टिक आणि कपड्यांच्या आरपार पाहता येत असे. कंपनीने या आधी देखील या सेंसरला डिसेबल करण्यात आले होते. आता द सनच्या वृत्तानुसार, कंपनीने आता या कॅमेरा सेंसरवर पुर्णपणे बंदी घातली आहे.

हे फिल्टर इन्फ्रारेडच्या मदतीने फोटोला वेगळा रंग देत असे. मात्र फोनच्या रिव्ह्यू यूनिट्समध्ये याचे खास फंक्शन समोर आले. यावर अनेक युजर्सनी प्रायव्हेसीबाबत चिंता व्यक्त केली होती. यानंतर वनप्लसने अपडेट जारी करत हे फीचर बंद केले.

Leave a Comment