पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या विकास दुबेचा एन्काऊंटर


कानपूर: उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. उत्तर प्रदेश पोलिस त्याला घेऊन कानपूरला येत होते, पण कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटली. यावेळी एका पोलिसाची बंदूक घेऊन विकास दुबेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा झाला आहे. ही घटना कानपूरमधील भौती परिसरात घडली.

पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला दुबे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झाला होता. माहितीनुसार विकास दुबेच्या कमरेत गोळी लागली होती. या घटनेत एक पोलिस देखील जखमी झाला होता. दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. पण डॉक्टरांनी दुबेला मृत घोषित केले.

काल कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अटक करण्यात आली होती. त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून पोलिसांनी अटक केली होती. माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती, पण पोलिसांना त्याआधीच ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले होते.

Loading RSS Feed

Leave a Comment