विकास दुबे एनकाऊंटर; हा घटनाक्रम एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे

गँगस्टर आणि हिस्ट्रीशीटर विकास दुबेला आज सकाळी चकमकीत ठार करण्यात आले. 8 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या विकास दुबेला गुरूवारी उज्जैनमधून अटक करण्यात आले होते. मात्र उज्जैनवरून कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला असताना, विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुबेने पोलिसांची बंदूक देखील हिसकावून घेतली. यानंतर आत्मरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुबे मारला गेला.

विकास दुबेच्या एन्काउंटरने देशभरात चर्चा सुरू झाले आहे. बॉलिवूड सेलिब्रेटी देखील हे एन्काउंटर पाहून हैराण झाले आहेत. अभिनेत्री तापसी पन्नूने देखील या एन्काउंटरवर आश्चर्य व्यक्त केले आहे. याशिवाय बॉलिवूडवर टीका करणाऱ्यांवर देखील तिने निशाणा साधला.

तापसीने ट्विट केले की, वाह ! याचा तर कधी आपण विचारच केला नव्हता आणि काही लोक बॉलिवूडवर आरोप करतात की येथील चित्रपट वास्तविकतेपासून खूप लांब असतात.

दरम्यान, 8 पोलिसांची हत्या करणारा दुबे मागील अनेक दिवसांपासून फरार होता. मागील काही दिवसांमध्ये त्याच्या संबंधित घटनाक्रम देखील एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच आहे. आधी त्याने कानपूरवरून उज्जैनला प्रवास केला, त्यानंतर उज्जैनमध्ये अटक व आता एन्काउंटर. तापसी देखील आपल्या ट्विटमध्ये ही एखाद्या बॉलिवूड सारखीच कथा असल्याकडे इशारा करत आहे.

Leave a Comment