देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आठ लाखांच्या टप्प्यावर


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले असून देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोरोनाबाधितांच्या आकड्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. देशात मागील २४ तासांत २६ हजार ५०६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४७५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत २१ हजार ६०४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

त्याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आठ लाखांच्या टप्प्यावर पोहचला आहे. मागील २४ तासांत वाढलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा सात लाख ९३ हजार ८०२ झाला आहे. दोन लाख ७६ हजार ६८५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर चार ९५ हजार ५१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाबाधितांची दररोज २० हजारांच्या पुढे संख्या वाढत असली तरीही उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण आधिक आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू यासारख्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.

Leave a Comment