कोरोना : या ठिकाणी मास्कबाबत अशा प्रकारे केली जात आहे जनजागृती

देशभरात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे.  घराच्या बाहेर पडताना मास्क घालणे देखील अनिवार्य आहे. मात्र काहीजण या नियमाचे पालन करत नाही. अशा लोकांना जागृक करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जात आहे. नुकतेच एका रेस्टोरेंटने मास्कच्या आकाराचा पराठा बनवून मास्क घालणे किती गरजेचे आहे हे सांगितले होते. आता दुसरीकडे एक महिला चक्क देवीचे रुप धारण करून लोकांना मास्क वाटत आहे.

तामिळनाडूच्या ग्रामीण भागांमध्ये लोक देवी मरियम्मनला आरोग्याची देवी म्हणून पुजतात. त्यामुळे एक महिला देवी मरियम्मनचे रुप धारण करून ग्रामीण भागातील लोकांना मास्क वाटून जागृक करत आहे. राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ग्रामीण भागातील लोक कोरोनापासून वाचण्यासाठी दिशानिर्देशांचे व्यवस्थित पालन करत नाहीत. त्यामुळे काहीजण अशी हटके पद्धत शोधून लोकांमध्ये जागृकता पसरवत आहेत.

एप्रिल महिन्यात अशाच प्रकारे दिल्ली पोलिसांनी लोकांना जागृक करण्यासाठी स्थानिक कलाकाराची मदत घेतली होती. हा कलाकार यमराज बनून लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत असे.

 

Leave a Comment