विकास दुबेच्या एनकाऊंटवर ट्विट केल्यामुळे ट्रोल झाली तापसी पन्नू


शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेशात 8 पोलिसांचा जीव घेणाऱ्या कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आला. पण याच दरम्यान या एनकाऊंटरवर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अभिनेत्री तापसी पन्नू हिनेही या प्रश्नांच्या फैरीत उडी घेतल्यामुळे तिने नेटकऱ्यांच्या टीकेचा रोष ओढवून घेतला आहे.


तापसी अनेक विषयांवर ठाम भूमिका घेण्यासाठी ओळखली जाते. तिने अशाच प्रकारे विकास दुबे याच्या एनकाऊंटरवर टीका केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करून तिने म्हटले आहे की, वाह.. असे काहीतरी होईल असा आपण विचारसुद्धा केला नव्हता. कोण म्हणते की आमच्या बॉलिवूडच्या चित्रपटांच्या कथा खोट्या असतात? अशी पोस्ट तापसीने केली होती, त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला प्रत्युत्तर देत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

जेव्हा 8 पोलीस कर्मचारी मारले गेले, तेव्हा काय झोपली होतीस का, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. त्याचबरोबर तुला का एवढा त्रास होत आहे? जेव्हा त्याच्यामुळे आठ पोलीस शहीद झाले, तेव्हा का प्रश्न विचारले नाहीस, असे तिला विचारले आहे. तर काहींनी तिच्यावर बहिष्कार घालण्याची मागणीही केली आहे. काहींनी यावर तिचे समर्थन केले असून उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment