सुब्रमण्यम स्वामींची सुशांत आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी


मुंबई – मुंबई पोलिसांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सुमारे तीन तास चौकशी करत जबाब नोंदवून घेतला होता. त्यातच आता मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीकरता सर्व आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एका वकिलाची नियुक्ती केली असून त्यांनी याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.


आतापर्यंत 32 हून अधिक लोकांचा या घटनेनंतर जबाबही नोंदवण्यात आला आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या निधनानंतर या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली. सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय तपासासाठी उचललेल्या पावलांमुळे ट्विटरवर त्यांचे कौतूक करत आभार मानले जात आहेत.

Leave a Comment