ठाणे महानगरपालिकेत १,९०१ पदांसाठी नोकर भरती


मुंबई – कोरोना संकटामुळे देशासह राज्यावर आर्थिक संकट ओढावले आहे, त्यातच अनेकजण बेरोजगार झाले असतानाच ठाणे महानगरपालिकेत १९०१ विविध पदांसाठी नोकर भरती होणार आहे. त्याकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याचबरोबर अर्ज दाखल करण्याची ११ जुलै ही अंतिम दिनांक आहे.

ठाणे महानगरपालिकेत इन्टेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी -एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी – आयुष, नर्स-जीएनएम, नर्स एएनएम, सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, बायोमेडिकल इंजिनियरिंग, बायोमेडिकल असिस्टंट, एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स, एचआर मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, डी ईसीओ टेक्नीशियन, मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट, एक्स-रे टेक्नीशियन, डायलिसिस तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, सीएसएसडी तंत्रज्ञ, एमजीपीएस तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, हार्डवेअर व नेटवर्किंग अभियंता पदांच्या एकूण १९०० पेक्षा जास्त रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

त्यासाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर खुल्या प्रवार्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवार्गासाठी ४३ वर्षे अशी वयाची अट ठेवण्यात आली आहे. https://est.tmconline.in/ या संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत https://thanecity.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment