अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे चुकीचे, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आले राहुल गांधी

देशात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्यांमुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय अनेक राज्यांनी घेतला होता. मात्र काही दिवसांपुर्वी यूजीसीने राज्यांना परीक्षेसाठी नियमावली जारी करत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास सांगितले आहे. या सर्वांमुळे गोंधळाच्या वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या समर्थनात उतले असून, त्यांनी यूजीसीला परीक्षा न घेण्याचे आवाहन केले आहे.

परीक्षा न घेण्याच्या विद्यार्थ्यांचा मागणीला पाठिंबा दर्शवत राहुल गांधी म्हणाले की, हा विद्यार्थ्यांसोबत अन्याय आहे. या मुद्यावर आपले मत मांडत राहुल गांधींनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, कोव्हिडने अनेकांना नुकसान पोहचवले आहे. शाळा-कॉलेजमधील आपल्या विद्यार्थ्यांना यामुळे कष्ट सहन करावे लागले आहे.

राहुल गांधींनी आरोप केला की, यूजीसी आपल्या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये भ्रम निर्माण करत आहे. आयआयटीमध्ये परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना पुढे पाठवण्यात आले. यूजीसी गोंधळ निर्माण करत आहे. त्यांनी मागील कामगिरीच्या आधारावर विद्यार्थ्यांना पास करावे असे म्हटले आहे.

Leave a Comment