केवायसीच्या नावाखाली पुण्यातील महिलेला तब्बल 14.59 लाखांचा गंडा

पुण्यातील एक 38 वर्षीय महिला ऑनलाईन फ्रॉडची शिकार झाली आहे. महिलेच्या खात्यातून तब्बल 14.49 लाख रुपये चोरी झाले आहेत. केवायसी (नो योर कस्टमर) अंतर्गत खातेधारकाची माहिती खात्याशी लिंक केली जाते. केवायसीच्या नावाखाली ठग खातेधारकांकडे बँकेची माहिती आणि ओटीपी विचारतात व फसवणूक करतात. याआधी देखील अशाप्रकारचे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले असून, बँक आपल्या खातेधारकांना वारंवार खाजगी माहिती शेअर न करण्याची सूचना देत असते.

महिलेला फ्रॉड करणाऱ्यांकडून फोन आला की, खात्याचे केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे. यानंतर माहिती शेअर करत महिलेच्या खात्यातून 14 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम चोरी झाली.

केवायसी फ्रॉडपासून वाचण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बनावट कॉलवर विश्वास ठेऊ नये. याशिवाय कोणतेही अ‍ॅप इंस्टॉल करून नये, खाजगी माहिती व ओटीपी शेअर करू नये आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळावे. बँक देखील वारंवार आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचविण्यासाठी वारंवार सुचना देत असते.

Leave a Comment