आई-वडिलांना वर्णभेदाचा सामना करावा लागला हे सांगताना या दिग्गज क्रिकेटपटूला कोसळले रडू

अमेरिकेत कृष्णवर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर जगभरात वर्णभेदी विरोधी लढ्याने जोर पकडला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने देखील या लढ्याला आपला पाठिंबा दिला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाने वर्णभेदावर आपला विरोध प्रकट केला. याच दरम्यान वेस्ट इंडिजचे  दिग्गज वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग यांना आपल्या आई-वडिलांसोबत घडलेल्या वर्णभेदाच्या घटनेबाबत सांगताना लाईव्ह टिव्ही दरम्यान रडू कोसळले.

मायकल होल्डिंग म्हणाले होते की, वर्णभेदावर संपुर्ण मानवजातीला शिक्षित न केल्यास हे असेच सुरू राहील. दुसऱ्या दिवशी याच मुद्यावर बोलताना ते भावूक झाले.

स्काय न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, ही भावनात्मक बाजू तेव्हा समोर आली, ज्यावेळी मी माझ्या आई-वडिलांबाबत विचार करण्यास सुरूवात केली. मला माहिती आहे माझे आई-वडिल कोणत्या परिस्थितीमधून गेले आहेत. माझे वडील अधिक कृष्णवर्णीय असल्याने आईच्या कुटुंबाने बोलणे बंद केले होते. मला माहिती आहे की ते कोणत्याही स्थितीमधून गेले आहेत, हे सांगताना मायकल होल्डिंग भावूक झाले.

Leave a Comment