Video : समुद्र किनारी मुलीला प्रपोज करण्यासाठी जात होता व्यक्ती, तेवढ्यात…

सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की एक व्यक्ती मुलीला प्रपोज करण्यासाठी जात आहे. तेवढ्यात त्याच्यासोबत घटना घडते. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला देखील हसू आल्याशिवाय राहणार नाही.

17 सेंकदाच्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोगान जॅक्सन आपली मैत्रीण मारिया गुग्लिओटाकडे तिला प्रपोज करण्यासाठी जात आहेत. मारिया कुत्र्यासोबत सुमद्र किनाऱ्यावर उभी आहे. लोगान तिच्याकडे जात असताना, अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो पडतो. त्याला पडताना पाहून मारिया देखील जोरजोरात हसू लागते.

He fell so hard he popped up with a ring!!! I’m so excited but first I have to stop laughing😂

Posted by Maria Gugliotta on Saturday, July 4, 2020

यानंतर जॅक्सन उठतो आणि गुडघ्यावर बसून मारियाला प्रपोज करतो व तिच्या हातात अंगठी घालतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला मारियाने मागील शनिवारी फेसबुकव शेअर केले होते. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ बघितला असून, अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment