ठाण्यातील लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढला; अशी आहे नवी नियमावली


ठाणे : कोरोनाचा ठाणे महापालिका क्षेत्रात वाढता प्रादुर्भाव पाहता तेथील लॉकडाऊन अजून आठ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात आता 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. रविवारी 19 जुलैपर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी काढले आहेत.

तत्पूर्वी 2 जुलै ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. पण ठाण्यात सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे हा लॉकडाऊन आठ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. कोरोनाची साखळीला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन असणार आहे. त्याचबरोबर या लॉकडाऊनबाबत पालिका प्रशासनाने नियमावली जारी केली आहे.

ठाणे महानगरपालिकेने जारी केलेली नियमावली

  • महापालिका हद्दीत आकर्षक आणि नाशवंत वस्तूंच्या ने-आण करण्याशिवाय इतर आणि सर्व कारणांकरिता लॉकडाऊन लागू असेल.
  • इंटरसिटी एमएसआरटीसी बसेस आणि मेट्रो सह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही .
  • टॅक्सी, ऑटो रिक्षा यांना परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. या ऑर्डरअंतर्गत ड्रायव्हरशिवाय केवळ एका प्रवाशाचा खाजगी वाहनांना परवानगी असलेल्या जीवनाश्यक वस्तू आरोग्य सेवा आणि या अंतर्गत मान्य कृतीकरिता परवानगी असेल.
  • सर्व आंतरराज्य बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटरकडून कामकाज बंद असेल. तर बाहेरून येऊन बाहेर जाणाऱ्या वाहनांना परवानगी असेल.
  • ज्या घरात प्रत्येक व्यक्तीला वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर तो/ ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल. त्या व्यक्तीला महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.
  • सर्व रहिवासी घरीच राहतील. सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. केवळ परवानगी असलेलेच कामासाठी बाहेर येतील.
  • सार्वजनिक ठिकाणी खरेदीसाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.
  • व्यावसायिक आस्थापना कार्यालय आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यादींसह सर्व दुकानांनी त्यांचे कामकाज बंद ठेवावे.
  • प्रक्रिया आणि फार्मास्युटीकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटला परवानगी असेल .
  • डाळ व तांदूळ गिरणी खाद्य आणि संबंधित उद्योग दुग्धशाळा खाद्य व चारा इत्यादींचा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांत गुंतलेल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्यास परवानगी असेल.
  • सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याची परवानगी असेल. चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक, आवारात योग्य स्वच्छता आणि सॅनिटायझर हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता गरजेची आहे.
  • अनावश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या खालील दुकाने आस्थापनांवर प्रतिबंध
  • बँका,एटीएम,विमा आणि संबंधितबाबी, आयटी आणि टेलिकॉम,टपाल,इंटरनेट आणि डेटा सेवांना वगळण्यात आले आहे.
  • फक्त घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्यास मुभा असेल.

Leave a Comment