प्रभासाच्या आगामी ‘राधेश्याम’चा फर्स्ट लुक रिलीज


कोरोनामुळे ठप्प पडलेली सिनेसृष्टी आता हळूहळू रुळावर येत आहे. त्यातच आता ‘बाहुबली’फेम अभिनेता प्रभासच्या आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. नुकताच प्रभासच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर निर्मात्यांनी रिलीज केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘राधेश्याम’ असे असून त्याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची प्रस्तुती गुलशन कुमार आणि टी-सीरीजची असून निर्मिती यूवी क्रिएशन्सद्वारे करण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून आज प्रभास आणि पूजा हेगडे यांचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला असून चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे दिसत आहेत. ‘राधेश्याम’ हा बिग बजेट चित्रपट असून 2021 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


प्रभाससोबतच या चित्रपटात पूजा हेगडे, भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सथ्यन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘राधेश्याम’ची सिनेमॅटोग्राफी मनोज परमहंस यांची असून प्रोडक्शन डिजाइनर आरवीवीएंडर आहेत. कमल कन्नन यांनी वीएफएक्स प्रोड्यूसर म्हणून धुरा सांभाळली आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरीज प्रस्तुत ‘राधेश्याम’, यूवी क्रिएशन्स प्रोडक्शनचा चित्रपट आहे.

Leave a Comment