भाजप खासदार कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण


भिवंडी : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होत आहे. त्यातच आता भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यात कोरोनाची यांना सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर खासदार कपिल पाटील यांच्यासह पत्नी, मुलगा, मुलगी, सून, पुतण्या यांसह एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तत्पूर्वी पुण्यातील महापौर, उपमहापौर यांच्यासह भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांचा रिपोर्ट कालच निगेटिव्ह झाला आहे. तसेच पुण्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन, नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.

Leave a Comment