सुशांतच्या अखेरच्या चित्रपटातील पहिले गाणे चाहत्यांच्या भेटीला

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’मधील पहिले गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे टायटल ट्रॅक ‘दिल बेचारा’मध्ये सुशांतचा डान्स आणि अंदाज पाहण्यासारखा आहे. व्हिडीओमध्ये सुशांत जबरदस्त अंदाजात एंट्री करताना दिसत आहे. गाण्याचा व्हिडीओ रिलीज होऊन अवघे काही मिनिटे झाली आहेत, मात्र सुशांतच्या चाहते यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. चाहते यावर  कमेंट्सकरून सुशांतचे कौतुक करत आहेत.

‘दिल बेचारा’ या टायटल ट्रॅकमध्ये सुशांत अभिनेत्री संजना सांघी सोबत डान्स करताना दिसत आहे. दोघांचीही जोडी शानदार वाटत आहे. अवघ्या एक तासात या गाण्याला जवळपास 5 लाखांपेक्षा अधिक जणांनी बघितले आहे.

दरम्यान, सुशांतचा अखेरचा चित्रपट असलेला ‘दिल बेचारा’ ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+ हॉटस्टारवर रिलीज होणार असून, हा चित्रपट सर्वांना मोफत पाहता येणार आहे. हा चित्रपट जॉन ग्रीन यांचे पुस्तक ‘द फॉल्ट इन ऑर स्टार्स’वर आधारित आहे.

Leave a Comment