‘दोन्ही देशांमध्ये कोणतेही शत्रूत्व नाही’, सीमावादावर चीनी राजदूताने शेअर केला व्हिडीओ

भारतातील चीनचे राजदूत सन विडोंग यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत दोन्ही देशांमध्ये कोणतेही शत्रूत्व नसून, मैत्रीचे संबंध असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये संघर्षावर विडोंग म्हणाले की, असे व्हावे असे कोणत्याही देशाला वाटत नाही. जे घडले त्याविषयी दोन्ही पैकी कोणत्याही देशाने विचार केला नसेल. 5 जुलैला चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी फोनवरून चर्चा केली होती. दोन्ही नेत्यांनी सीमावरील तणाव कमी करण्यास सहमती दर्शवली होती. सध्या फ्रंटलाईन ट्रूप्स मिलिट्री कोर कमांडर स्तरावर तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीन आणि भारत शत्र नसून, भागीदार आहेत. 2 हजार वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्या मैत्रीपुर्ण संबंधांचे आदान-प्रदान आहे.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार चीनी राजदूत म्हणाले की, दोन्ही देशांनी कोरोना संकटाचा एकत्र येऊन सामना करायला हवा. ही संकटाची वेळ असून, एकमेंकाची मदत करायला हवी. कोरोनाच्या युद्धात खांद्याला खांदा लावून लढले पाहिजे.

चीनी अ‍ॅप्सवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीवर राजदूत म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये व्यापार आहे. चीनकडून भारतात मोबाईल, घरगुती उपकरण, पायाभूत सुविधा आणि ऑटोमोबाईल निर्मितीच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाले. काही लोक मेड इन चायनाला पुर्णपणे बाहेर करण्यासाठी भारत-चीन आर्थिक आणि व्यापारिक संबंधांना वेगळे असल्याचे ओरडून सांगत आहेत. हा नोकऱ्या गमावणाऱ्या चीनी कर्मचाऱ्यांसोबतच भारतीय कर्मचाऱ्यांवर देखील अन्याय आहे. याशिवाय उत्पादनापर्यंत पोहचू न शकणाऱ्या ग्राहकांसाठी हे अनुचित आहे.

Leave a Comment