विकास दुबेच्या एन्काउंटवर मनोज बाजपेयी बनवणार चित्रपट?, अभिनेत्याने सांगितले सत्य

कानपूर हत्याकांडचा मास्टरमाइंड गँगस्टर विकास दुबे आज सकाळी एन्काउंटरमध्ये मारला गेला. ज्या प्रकारे विकास दुबे फरार झाला व त्यानंतर त्याचे एन्काउंटर करण्यात आले, हा सर्व घटनाक्रम एखाद्या चित्रपटासारखा होता. एवढेच नाहीतर प्रोड्यूसर संदीप कपूरने अभिनेता मनोज वाजपेयीला या संपुर्ण प्रकरणावर एक चित्रपट करण्यास देखील सांगितले. प्रोड्यूसर संदीप कपूर यांच्या या ट्विटनंतर माध्यमांमध्ये मनोज बाजपेयी या संपुर्ण घटनाक्रमावर चित्रपट बनवणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होऊ लागले. मात्र आता सत्य स्वतः मनोज बाजपेयीने सांगितले आहे.

प्रोड्यूसर संदीप कपूरने ट्विट केले की, जे काही आज एन्काउंटरमध्ये झाले ते एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. मनोज बाजपेयी पुढील चित्रपटात विकास दुबेची भूमिका साकारणे कसे होईल. तुम्ही या भूमिकेत कमाल कराल. मात्र नंतर कपूर यांनी हे ट्विट केले.

सोशल मीडियावर मनोज बाजपेयी ही भूमिका साकारणार अशी चर्चा सुरू होताच स्वतः मनोज बाजपेयी यांनी ट्विट करत ही माहिती खोटी असल्याचे सांगितले. त्यांनी ट्विट केले की, चुकीची बातमी.

दरम्यान, गँगस्टर आणि हिस्ट्रीशीटर विकास दुबेला आज सकाळी चकमकीत ठार करण्यात आले. 8 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या विकास दुबेला गुरूवारी उज्जैनमधून अटक करण्यात आले होते. मात्र उज्जैनवरून कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला असताना, विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुबेने पोलिसांची बंदूक देखील हिसकावून घेतली. यानंतर आत्मरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुबे मारला गेला.

Leave a Comment