या कंपनीच्या नवीन फोनमध्ये बंदी घातलेली चीनी अ‍ॅप, आता दिले स्पष्टीकरण

पोकोने नुकताच आपला नवीन स्मार्टफोन पोको एम2 प्रो भारतात लाँच केला आहे. हा फोन सध्या बंदी घालण्यात आलेल्या चीनी अ‍ॅपमुळे चर्चेत आहे. या फोनच्या रिव्ह्यू यूनिटमध्ये बंदी घालण्यात आलेल्या चीनी अ‍ॅप हेलो आधीपासूनच देण्यात आलेले आहे. यावरून विवाद सुरू झाल्यानंतर आता कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.

टेक ब्लॉगर अभिषेक भटनागरने आपल्या एका व्हिडीओमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याने पोको एम2 प्रो मध्ये हेलो अ‍ॅपसोबत एक अन्य सिक्युरिटी अ‍ॅपवर देखील प्रश्न उपस्थित केले होते. याशिवाय फोनमध्ये क्लिन मास्टर हे देखील बंदी घातलेले अ‍ॅप देण्यात आलेले आहे.

पोकोने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, ज्या स्मार्टफोन यूनिटची चर्चा सुरू आहे. त्याचे सॉफ्टवेअर व्हर्जन आणि उत्पादन सरकारच्या निर्णयाच्या आधी सुरू झाले होते. कंपनी एका सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ही समस्या सोडवत आहे. कंपनी भारत सरकारने बंदी घातलेल्या कोणत्याही अ‍ॅपसोबत डेटा शेअर करत नाही.

Image Credited- YouTube

दरम्यान, भारतात हा फोन 13,999 रुपये किंमतीत लाँच केला आहे. या फोनमध्ये 4GB + 64GB आणि 6GB + 64GB असे दोन व्हेरिएंट मिळतील. यात 5,000 एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Leave a Comment