विकास दुबे चकमक : सोशल मीडियावर का ट्रोल होत आहेत आनंद महिंद्रा ?

उत्तर प्रदेश पोलीस दलातील 8 कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबे आज सकाळी पोलीस चकमकीत मारला गेला. सोशल मीडियावर हे एन्काउंटर खरे होते की बनावट यावरून वाद सुरू झाला आहे. या प्रकरणावरून राजकारण सुरू झाले आहे. मात्र या प्रकरणावरून सोशल मीडियावर नेटकरी विनाकारण उद्योगपती आनंद महिंद्रांना ट्रोल करत आहेत.

Image Credited – scoopwhoop

पोलिसांनुसार गँगस्टर विकास दुबेला उज्जैनवरून कानपूरला आणत असताना रस्त्यात गाडी पलटली. ही गाडी महिंद्रा टीयूव्ही 300 होते. याच कारणामुळे नेटकऱ्यांना आनंद महिंद्रा यांना ट्रोल करण्याचे कारण सापडले.

अनेक युजरने सोशल मीडियावर महिंद्रा टीयूव्ही300 सुरक्षित नसल्याचे म्हटले. गाडी चांगल्या रस्त्यावर देखील विनाकारण पलटत असल्याचे युजरने म्हटले आहे. अनेक युजर्सनी यावर आनंद महिंद्रांना टॅग करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

Leave a Comment