मरकजमध्ये सहभागी झालेल्या 82 बांगलादेशी नागरिकांना जामीन मंजूर

दिल्लीच्या न्यायालयाने मरकजच्या एका कार्यक्रमात भाग घेऊन व्हिसा नियम, दिशानिर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या तबलिगी जमातच्या 82 बांगलादेशी नागरिकांना जामीन मंजूर केला आहे. या 82 आरोपींवर व्हिसा नियमांचे उल्लंघन करण्याशिवाय, कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करणे आणि मिशनरी कार्यात बेकायदेशीर सहभाग असल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. मुख्य मेट्रोपोलिटिन मॅजिस्ट्रेट गुरमोहिना कौर यांनी प्रत्येक बांगलादेशीला 10-10 हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात एनडीटिव्हीने वृत्त दिले आहे.

या विदेशी नागरिकांचे वकील आशिमा मंडला आणि मंदाकिनी सिंह यांनी सांगितले की, आरोपींनी आज न्यायालयात सेटलमेंट अर्ज (प्ली बार्गेनिंग अर्ज) दिला. अशा अर्जाअंतर्गत आरोपी आपला दोष कबूल करतो आणि त्यास कमी शिक्षा देण्याची विनंती करतो.

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अंतर्गत, ज्या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा सात वर्षे आहे, समाजातील सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत नाही असे गुन्हे आणि 14 वर्षांखालील स्त्री किंवा मुलाविरूद्ध नसलेला अपराधात सेटलमेंट अर्ज मंजूर करतात. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणी दरम्यान सर्व परदेशी नागरिकांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Leave a Comment