वेस्पाच्या दोन नवीन स्कूटर सादर, 1,000 रुपयात करता येणार बुकिंग

पियाज्जो इंडियाने आपले दोन स्कूटर्स वेस्पा व्हीएक्सएल आणि वेस्पा एसएक्सएलचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे. कंपनीचे हे दोन्ही स्कूटर्स 125सीसी आणि 150सीसी इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध असतील. वेस्पा व्हीएक्सएल आणि एसएक्सएल या दोन्हीमध्ये नवीन बीएस6 कम्प्ल्यांट इंजिन देण्यात आलेले आहे. सोबतच कॉस्मेटिक अपग्रेड्स आणि नवीन फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत.

Image Credited – navbharattimes

वेस्पाच्या या दोन्ही नवीन स्कूटर्सला कंपनीच्या वेबसाईट्सवरून केवळ 1 हजार रुपयांमध्ये बूक करता येईल. यांच्या खरेदीवर कंपनी 2 हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स देत आहे. वेस्फा व्हीएक्सएल आणि एसएक्सएल फेसलिफ्ट स्कूटर्स आधीप्रमाणे मोनोकॉक स्टील बॉडी आणि 5 स्पॉक एलॉय व्हिल्जसोबत रेट्रो इटॅलियन स्टायलिंगसोबत येते.  अपडेटेड मॉडेल्समध्ये नवीन एलईडी हेडलाईट्स आणि एलईडी डेटाटाईम रनिंग लाईट देण्यात आली आहे. याशिवाय स्कूटर्समध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, बूट लाईट, एजस्टेबल रिअर सस्पेंशन देण्यात आले आहे. फ्रंटला टेलेस्कोपिक फ्रंट फोर्क्स संस्पेंशन देण्यात आलेले आहेत.

Image Credited – navbharattimes

अपडेटेड वेस्पा VXL आणि SXL स्कूटरमध्ये बीएस6 कम्प्लायंट इंजिन मिळेल. वेस्पा SXL 125 आणि VXL 125 मध्ये 124.45cc, सिंगल-सिलेंडर, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे, जे 9.9hp पॉवर आणि 9.6Nm टॉर्क जनरेट करते. तर वेस्पा SXL 150 आणि VXL 150 स्कूटर्समध्ये 149.5cc, सिंगल-सिलेंडर, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे, जे 10.5hp पॉवर आणि 10.6Nm टॉर्क जनरेट करते.  दोन्ही इंजिन CVT ऑटोमॅटिक यूनिटने सुसज्ज आहेत.

या दोन्ही स्कूटर्स या महिन्याच्या अखेरीस लाँच होणार आहेत. कंपनीने अद्याप स्कूटर्सच्या किंमतीबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. फेसलिफ्ट मॉडेल्सची किंमत सध्याच्या मॉडेलप्रमाणेच 1.08 ते 1.125 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment