चीनला लवकरच चांगली अद्दल घडवणार, अमेरिकेचा इशारा

कोरोना व्हायरस महामारीच्या संकटावरून अमेरिका वारंवार चीनवर निशाणा साधत आहे. आता अमेरिका चीनवर अतिरिक्त कारवाई करण्याच्या तयारीत आहे. व्हाईट हाऊसने या संदर्भात माहिती दिली आहे. मात्र चीनवर काय कारवाई केली जाईल याबाबत अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. कोरोना व्हायरसवरून मागील काही महिन्यात चीन आणि अमेरिकेमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हायरसबाबत वारंवार चीनला जबाबदार धरले आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मेकेनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, चीनवर आम्ही काय कारवाई करणार आहोत, याबाबत माहिती देताना मी राष्ट्रपतींच्या पुढे जाणार नाही. मात्र तुम्ही काही आगामी कारवाई बाबत ऐकत असाल, जी चीनशी संबधित आहे. तर मी याची पुष्टी करते.

दोन्ही देशांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोना व्यतिरिक्त चीनने हाँगकाँगमध्ये आणलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा, अमेरिकन पत्रकांना देशात बंदी, चीनमध्ये उइगर मुस्लिमांसोबतचा व्यवहार आणि तिबेट प्रश्नावरून तणाव निर्माण झाला आहे.

Leave a Comment