UIDAI ची नवी सुविधा; आता विना कागदपत्र बनवू शकता आधार कार्ड


नवी दिल्ली : देशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड हे एक महत्वपूर्ण दस्तावेज बनले असून पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात आधार कार्डला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. कोणत्याही सरकारी कामासाठी आधार कार्ड बंधनकारक असल्यामुळे आधार कार्ड नसल्यास आपली कामे रखडतात. त्यातच नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी फोटो ओळखपत्र त्याचबरोबर रहिवास दाखला महत्वाचा असतो. पण आता यापुढे विना कागदपत्र आधार कार्ड बनवता येणार आहे. UIDAI ने अशाप्रकारची नवी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. विना कागदपत्र आधार कार्ड बनवण्यासाठी आधार केंद्रावर तुम्ही इंट्रोड्यूसरची मदत घेऊ शकता.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) विना कागदपत्र आधार बनवण्याची सुविधा दिली आहे. इंट्रोड्यूसर तो व्यक्ती असतो, ज्यास रजिस्ट्रारद्वारे अशा रहिवाश्यांच्या ओळखीसाठी अधिकृत केले जाते, ज्यांच्याकडे फोटो ओळखपत्र आणि रहिवास दाखला नाही. पण त्या इंट्रोड्यूसरकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि अर्जदारासोबत त्याने आधार नोंदणी सेंटरवर उपस्थितीत राहणे आवश्यक आहे.

अर्जदाराची ओळख आणि त्याचा रहिवास पत्ता इंट्रोड्यूसरने निश्चित करणे जरूरी आहे. त्यांना एनरॉलमेंट फॉर्मवर यासाठी हस्ताक्षर करणे आवश्यक असते. युआयडीएआयकडून जारी पत्रकानुसार, इंट्रोड्यूसरसाठी अर्जदाराच्या नावे सर्टिफिकेट जारी करावे लागते. त्याची वॅलिडिटी 3 महीने असते.

जर ओळखपत्र आणि रहिवास दाखला तुमच्याकडे नसेल, तरी सुद्धा आधार कार्डसाठी अर्ज करता येतो, यासाठी रेशनकार्डसारख्या एखाद्या कौटुंबिक दस्तावेजामध्ये नाव असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात जरूरी आहे की अगोदर कुटुंब प्रमुखाचे ओळखपत्र आणि रहिवास दाखल्याच्या आधारावर आधारकार्ड तयार केलेले असावे. यानंतर कुटुंबप्रमुख कुटुंबातील इतर सदस्यांचा इंट्रोड्यूसर बनू शकतो.

Leave a Comment