ट्रोलिंगला कंटाळून अंकिताच्या बॉयफ्रेंडने उचलले मोठे पाऊल


मुंबईतील राहत्या घरी मागील महिन्यात गळफास घेऊन अभिनेता सुशांत सिंह राजपुतने आपले जीवन संपवले. पण त्यानंतर सुशांतने बॉलीवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीमुळे आपले जीवन संपवल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्यामुळे त्याच्या निधनानंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. बॉलीवूडमधील या घराणेशाहीवर अनेक कलाकारांनी वक्तव्य केल्यानंतर निर्माता करण जोहर आणि आलिया भट्टवर सुशांतच्या चाहत्यांनी निशाणा साधला. यातून सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंडदेखील सुटला नाही. नेटकऱ्यांनी त्याला देखील ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगला कंटाळून त्याने मोठे पाऊल उचलले आहे.

अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड विकी जैन एक उद्योगपती असून तो सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. पण नेटकऱ्यांनी सुशांतच्या निधनानंतर त्याच्यावर निशाणा साधल्यामुळे त्याचा कमेंट बॉक्स त्याने सर्वांसाठी बंद केला आहे. लिमिटेड कमेंट हा पर्याय त्याने निवडल्यामुळे आता तो फॉलो करत असलेल्या व्यक्ती केवळ त्याच्या पोस्टवर कमेंट करु शकतात. ट्रोलिंगला कंटाळून त्याने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

त्याचबरोबर विकीला अनेकांनी इन्स्टाग्रामवर अंकितासोबत ब्रेकअप करण्यास सांगितले होते. तर दुसरऱ्या एका यूजरने तू अंकिता आणि सुशांतच्या मध्ये आला असशील, असे म्हणत सुनावले आहे. विकीला काहींनी अंकिताची काळजी घेण्यासही सांगितले आहे. अंकिताला सुशांतच्या अचानक एक्झिटमुळे धक्का बसला आहे. तू तिची काळजी घे, असे एका यूजरने म्हटले आहे.

Leave a Comment