अशा प्रकारे लपवू शकता व्हॉट्सअॅपवरील सिक्रेट चॅटिंग


सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हॉट्सअॅप हे इस्टंट मेसेजिंग अॅप सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले असून आपल्या देशातील तब्बल अडीच कोटी लोक या अॅपचा वापर करतात. पण आपल्यापैकी अनेकजणांना दुसऱ्यांचे चॅट वाचण्यात समाधान मानतात. त्यामुळे आपला मोबाईल चुकून दुसऱ्या व्यक्तिच्या हातात गेला आणि त्याने आपले आपले सिक्रेट चॅटिंग वाचले तर? अशी भीती अनेकदा आपल्या मनात निर्माण होते, त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण वेळोवेळी सावधगिरी म्हणून चॅट हिस्ट्री डिलीट करत असतात. पण आम्ही आज तुम्हाला काही सोप्या ट्रिक सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅपमधील सिक्रेट चॅटिंग लपविता येणार आहे.

त्यासाठी तुम्हाला सर्वात सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल. त्यानंतर ज्या व्यक्तीचे मॅसेज तुम्हाला लपवायचे आहेत, त्याचे नाव काही वेळ दाबून ठेवा. त्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला अर्काइव्ह ऑप्शन दिसेल, ते सिलेक्ट करा. असे करताच त्या व्यक्तीचे चॅट व्हॉट्सअॅपमधून गायब होईल.

त्याचबरोबर त्या व्यक्तिचे चॅटिंग पुन्हा आणण्यासाठी सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करा. चॅट क्रीन स्क्रोल करा आणि सर्वातत खाली जा. तिथे अर्काइव्ह ऑप्शन दिसेल त्याला टॅप करा. त्या व्यक्तीचे नाव थोडा वेळ दाबून ठेवा. त्यानंतर अनअर्काइव्ह ऑप्शनवर क्लिक करा.

Leave a Comment