फूटपाथवर राहून 10वीत फर्स्ट क्लासने पास, मजूराच्या मुलीला बक्षीस मिळाले घर

मध्य प्रदेशच्या इंदुर येथे एका गरीब विद्यार्थीने दहावीच्या परीक्षेत 68 टक्के गुण मिळवले आहेत. या हुशार विद्यार्थीनीच्या कामगिरीवर खुश होऊन आता महानगरपालिकेने तिला एक घर बक्षीस म्हणून दिले आहे. या विद्यार्थीनीचे नाव भारती खांडेकर असून, तिचे आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे. या आधी तिचे कुटुंब फुटपाथवर राहत असे. भारतीचे वडील दशरथ खांडेकर हे कधीही शाळेत गेले नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे.

भारतीने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील आणि शिक्षकांना दिले आहे. ती म्हणाली की, मला दहावीत 68 टक्के गुण मिळाले. याचे श्रेय आई-वडिलांना जाते, ज्यांनी मला शाळेत पाठवण्यास मेहनत केली. मी आनंदी असून, मला आयएएस अधिकारी बनायचे आहे. आम्ही फुटपाथवर जन्मलो आणि तेथेच अभ्यास केला. आमच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते, आम्ही फुटपाथवरच राहायचो. मला हे घर देण्यासाठी आणि शिक्षण मोफत करण्यासाठी प्रशासनाचे आभार मानते.

दशरथ खांडेकर म्हणाले की, मी आणि माझी पत्नी मजूरी करतो.  मुलीने अधिकारी व्हावे अशी माझी इच्छा आहे. भारतीची आई लक्ष्मी या देखील मुलगी पास झाली व घर मिळाल्याने आनंदी आहेत.

पंतप्रधान आवास योजनेचे अधिकारी प्रशांत दिघे यांनी सांगितले की, इंदुरमधील एका मुलगी फुटपाथवर राहत होती. ही मुलगी 10वीमध्ये प्रथम श्रेणीने पास झाली आहे. आयुक्तांची परवानगी घेऊन मुलीला 1 बीएचके घर बक्षीस म्हणून देण्यात आले आहे. तिला टेबल, खर्ची आणि कपडे देखील देखील देण्यात आले आहेत. विद्यार्थीनीला पुढील शिक्षण देखील मोफत मिळणार आहे.

Leave a Comment