अद्याप जाहिर झालेली नाही CBSE बोर्डाच्या निकालाची तारीख


नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची माहिती व्हायरल होत आहे. पण अशी कोणतीही माहिती सीबीएसई बोर्डाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याचबरोबर ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने अनेक माध्यमांनी निकालाची बातमी दिली होती. पण हे वृत्त ‘एएनआय’नेही मागे घेतल्याचे नमूद केले आहे.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाबाबत एक नोटीस व्हायरल होत आहे. पण ही नोटीस खोटी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा फेक नोटीसवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाला सीबीएसई बोर्डाने दिलेल्या माहितीत 15 जुलैपर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकाल जाहीर होण्याचे संकेत दिले होते. पण अद्याप तशी अधिकृत माहिती सीबीएसई बोर्डाकडून समोर आलेली नाही. बोर्डाकडून परीक्षांच्या निकालाबाबत तयारी सुरु असून लवकरच निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल कोरोना संकटामुळे रखडला आहे. परीक्षेचा निकाल कधी जाहीर होईल? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत आहे. अशा परिस्थितीत परीक्षेच्या निकालाबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती फिरत असल्याचे समोर आले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment