न्यायालयाने फेटाळली सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडमधील दिग्गजांविरोधातील याचिका

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी बिहारमध्ये सलमान खान, करण जोहर, एकता कपूर, आदित्या चोप्रा आणि संजय लीला भन्सालीसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली होती. मात्र आता बिहारच्या मुजफ्फरपूर येथील एका न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे.

मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांनी हे प्रकरण त्यांच्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असल्याचे म्हणत वकील सुधीर कुमार ओझा यांच्याद्वारे दाखल तक्रार फेटाळली आहे.

सुधीर कुमार ओझा यांनी करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर आणि अभिनेता सलमान खान यांच्यासह ८ जणांवर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आयपीसी 306, 109, 504 आणि 506 कलमांतर्गत तक्रार दाखल केली होती.

तक्रार फेटाळल्यानंतर ओझा म्हणाले की, मी जिल्हा न्यायालयात या निर्णयाविरोधात आवाहन देईल. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू बिहारमध्ये दुःखाची लाट आहे. आपल्याला त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

Leave a Comment