सेबीमध्ये इंटर्नशीपची सुवर्णसंधी, 35 हजार रुपये स्टायपेंड

सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) आपल्या एक वर्षांच्या इंटर्नशीप प्रोग्रामसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. या आधी इंटर्नशीपसाठी अर्ज करण्याची तारीख 10 जून होती, मात्र आता ही तारीख वाढवून 31 जुलै करण्यात आली आहे. सेबीच्या आर्थिक आणि धोरण विश्लेषण विभागात ही इंटर्नशीप आहे.

ही इंटर्नशीप 12 महिन्यांची असेल. इंटर्नला या दरम्यान 35 हजार रुपये स्टायपेंड देण्यात येईल. इच्छुक उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पीएचडी प्रोग्राममध्ये 2 वर्ष पुर्ण करणे गरजेचे आहे. याशिवाय उमेदवाराचे पीएचडी थेसीस वित्तीय अर्थशास्त्राशी संबंधित असावे. आकडेवारीमधील ज्ञान आणि कौशल्य आवश्यक आहे. आर/पायथनमध्ये प्रोग्रामिंगचे ज्ञान असल्यास अधिक चांगले आहे. पार्ट टाइम पीएचडी विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकत नाही.

सेबीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, उमेदवार ज्या संस्था अथवा विद्यापीठातून पीएचडी करत आहे, त्याच्या विभागध्यक्षच्या माध्यमातून हॉर्डकॉपी स्वरूपात अर्ज करावा लागेल. व्यक्तिगत अर्ज स्विकारला जाणार नाही.

 

Leave a Comment