प्रोव्हिडंट फंडातून पैसे काढण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याची नाही गरज


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) याबाबत नमूद केले की, महामारी-कोविड १९ च्या संकटकाळात ईपीएफ सदस्याला संबंधित पैसे काढण्यासाठी दावा दाखल करण्यासाठी कोठेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता पडणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे आता कोरोनाच्या संकटकाळात आपल्याला रोख रक्कम हवी असल्यास आपल्या पीएफमधून आपण सहज काढू शकता. तत्पूर्वी ईपीएफ सदस्यांना कोरोनाच्या संकटकाळात त्यांच्या पीएफ खात्यामधून 3 महिन्यांच्या पगाराची रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली होती.


या संदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ)दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये ईपीएफओने असे म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटकाळात पैशांची गरज असल्यास पीएफमधील पैशांसाठी दावा दाखल करण्यासाठी ईपीएफ सदस्याला कोणतेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्र देण्याची आता आवश्यकता नाही. त्याचबरोबर ईपीएफओने आपल्या सर्व ग्राहकांना ईपीएफओच्या सोशल मीडिया हँडल्सला सब्सक्राइब करण्यापूर्वी सोशल मीडिया हँडल्सची सखोल तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर अश्या मिळत्या जुळत्या अकाउंट्सना फॉलो करू नका. त्यासाठी आमच्या फेसबुक- @socialepfo, ट्विटर- @socialepfo, यूट्यूब- @Employees’ Provident Fund Organitsation या अधिकृत हँडल्सशी कनेक्ट राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment