लवकरच मैदानावर परतणार धोनी, निवृत्तीचा कोणताही निर्णय नाही - Majha Paper

लवकरच मैदानावर परतणार धोनी, निवृत्तीचा कोणताही निर्णय नाही

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील एक वर्षांपासून क्रिकेटपासून लांब आहे. धोनीने शेवटचा सामना 2019 च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. मागील काही दिवसांपासून धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा देखील सुरू होती. मात्र आता धोनीचे मॅनजेर मिहीर दिवाकरने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. धोनी लवकरच मैदानावर खेळताना दिसणार आहे.

पीटीआयशी बोलताना मिहीर दिवाकरने सांगितले की, धोनी सध्या निवृत्तीबाबत कोणताही विचारत करत नाही आहे. मित्र असल्याने आम्ही क्रिकेटबद्दल जास्त चर्चा करत नाही. मात्र त्याला पाहून असे वाटत नाही की तो सध्या निवृत्ती घेणार आहे.

या वर्षी आयपीएल झाल्यास, तो धोनी त्यात खेळण्यास पुर्णपणे तयार आहे. यासाठी त्याने मेहनत देखील घेतली आहे. चेन्नईमध्ये त्याने ट्रेनिंग देखील घेतले होते. आयपीएलमध्ये खेळल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये देखील धोनी खेळताना दिसू शकतो.

Leave a Comment